🕒 1 min read
नवी दिल्ली : पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आणि भाजपला मात देण्याकरता नवी रणनीती आखण्यासाठी रविवारी (१३ मार्च) रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी निवडणूक होईपर्यंत सोनिया गांधी (Soniya Gandhi) काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहतील, असा निर्णय या एकमताने घेण्यात आला. दरम्यान, या पराभवासाठी गांधी कुटुंब जबाबदार नाही, असे वक्तव्य पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की,‘आम्ही सर्वांनी सोनिया गांधींना सांगितले की या पराभवाला त्या एकट्या एकट्या जबाबदार नाही. यासाठी गांधी कुटुंब नाही तर राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, असे खरगे म्हणाले.
दरम्यान, या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, जर काही लोकांना असे वाटत असेल की या परिस्थितीला गांधी कुटुंब जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, तर आम्ही पक्षासाठी कोणताही त्याग करण्यास तयार आहोत. आम्ही पद सोडायला तयार आहोत. मात्र, सोनिया गांधींचा हा प्रस्ताव सीडब्ल्यूसीच्या सदस्यांनी लगेच फेटाळून लावला.
महत्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधीमुळे कॉंग्रेसचे मोठे नुकसान’ – मनोज तिवारी
- क्रिकेट जगतातील अजबच ‘मॅन ऑफ द मॅच’ ; ग्राउंड्समनलाही करण्यात आले होते सन्मानित
- “…या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका”, चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
- चालू कार्यक्रमात अक्षय कुमारने मारला परिणीती चोप्राला टोमणा; व्हिडिओ व्हायरल
- “तपास यंत्रणांच्या टार्गेटवर शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते” – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
