🕒 1 min read
मुंबई: पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा जबाब नोंदवून घेतला. यावरच आज (१४ मार्च) फडणवीस यांनी संसदेत संताप व्यक्त करत मविआ सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात एक स्थगन प्रस्ताव आज विधानसभेत मांडला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी उत्तर देताना फडणवीसांना या प्रकरणात गोवण्याचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने संताप व्यक्त केला. तसेच मला प्रश्नावली पाठवण्यात आली होती. त्यावर मी लेखी उत्तर देऊन सांगितलं होतं की मला उत्तर द्यायचं आहे. मला प्रिव्हलेज घ्यायचं नव्हतं हेही मी स्पष्ट केलं होतं. मला जी प्रश्नावली पाठवण्यात आली होती त्यातील प्रश्न साक्षीदाराचे होते. कालचे प्रश्न आरोपीसाठीचे होते. तुम्ही ऑफिशियल सिक्रेसीचा भंग केला का? असा प्रश्न मला विचारण्यात आला. असं साक्षीदाराला विचारतात का? जाणीवपूर्वक प्रश्नावली बदलून या व्यक्तीला गुंतवता येतं का हेही यातून दिसत होतं. असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
मुंबई पोलिसांकडून प्रश्नावली प्राप्त झाल्यावर मी लेखी कळविले होते, की मी उत्तर देणार आहे. नंतर मला नोटीस आली.
आधी जे प्रश्न विचारले ते साक्षीदारासाठीचे होते.
पण, कालचे प्रश्न हे आरोपी करता येते का, या हेतूने होते.
ते कुणी बदलले हेही मला माहिती आहे.#BudgetSession pic.twitter.com/pmmzmWRdn9— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 14, 2022
तसेच “मी वकील आहे. मला समजतं. एक नागरिक म्हणून व्हिसल ब्लोअर अॅक्टप्रमाणे मी प्रोटेक्टेड आहे. जे कागदपत्रं माझ्याकडे होते. ते मी कुणाला दिले नाही. केंद्रीय गृहसचिवांना मी ते दस्ताऐवज दिले. पण तुमच्या मंत्र्यानेच ते मीडियाला दिले.”असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधत म्हटले की, “इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना १८ महिने तुरुंगात ठेवले. त्यांनीही कोणता गुन्हा केला नव्हता. आम्ही जेलला घाबरणारे नाही. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे अशा प्रकारच्या मुद्द्यावर आम्ही लढतच राहणार. जी काही कायदेशीर लढाई असेल ती लढू.”
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे उत्तर-
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. एसआयटीतील (SIT) डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू असून विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे. पोलिसांनी काही प्रश्न विचारले तरी उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे. असे ते म्हणाले आहे.
तसेच हा सर्व रुटीनचा भाग आहे. क्रिमिनल केसेसमध्ये कुणालही इम्युनिटी नाही. फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली. केवळ माहिती घेण्यासाठी नोटीस दिली. जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा किंवा कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा संबंध नाही. असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीसांचा जबाब का घेतला याचे उत्तर दिलीप वळसे पाटलांनी दिले…
- “नाना पटोलेंना उर्जामंत्री करा, तेच…”; सोलापुरातील काँग्रेस नेत्यांची मागणी
- “इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष…”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
- ‘तो धोनी सारखा कुल’ म्हणत इरफान पठाणने केली ‘या’ खेळाडूची प्रशंसा
- कोरोना नुकसान भरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
