Share

भिवंडीत “काश्मिर फाईल्स” चित्रपट बंद केल्याच्या विरोधात भाजप आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

ठाणे: काश्मिर मधील सत्य घटना मांडणारा काश्मिर फाईल्स हा चित्रपट भिवंडीतील चित्रपटगृहाच्या मालकाने बंद केल्याच्या विरोधात भाजप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी कार्यकर्त्यांनी चित्रपट गृहाच्या मालकाला जाब विचारला. शिवाय चित्रपट पुन्हा सुरु करण्यासाठी निजामपुरा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. त्यामुळे भिवंडीतील राजकीय वातावरण तापल्याचे बघायला मिळत आहे.

भिवंडी शहरातील पीव्हीआर सिनेमागृहात ‘काश्मिर फाईल्स’ या सिनेमाच प्रदर्शन थांबवण्यात आल्याने भाजपच्या गोटात तीव्र पडसाद उमटले. प्रदर्शित झालेला हा चित्रपट तांत्रिक अडचण सांगत सिनेमा अर्ध्यात थांबवण्यात आला. तर आजपासून हा चित्रपट थेट बंदच करण्यात आला. याची जनतेतून तीव्र प्रतिक्रीया उमटल्यानंतर भारतीय जनता पक्ष, बजरंग दलाच्या शिष्टमंडळाने शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी, राजेश कुंटे, दादा गोसावी यांचे नेतृत्वाखाली प्रशासनाची भेट घेत या सिनेमाच प्रदर्शन थांबवल्या बाबत चालकाला जाब विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!