Share

वेस्टइंडीज खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, इंग्लंड संघाने आमचा…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : वेस्टइंडीज संघाचा दिग्गज अष्टपैलू कार्लोस ब्राथवेट याने इंग्लंड संघावर एक मोठा आरोप केला आहे. तो म्हणाला आहे. की एंटीगुआ कसोटी सामन्यात इंग्लंडने वेस्टइंडीज संघाचा अपमान केला आहे.

कार्लोस बीटी स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, “जर मी वेस्टइंडीज संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये असतो. तर मी याला अपमान मानला असता. दोन सेट फलंदाज खेळत होते, आणि गोलंदाजाला पिचची काहीही मदत मिळत नव्हती. असे असूनही इंग्लंड संघाला वाटत होते. की ते ६ विकेट्स घेऊ शकतील. जर ही एशेष मालिका असती, तर त्यांनी असेच केले असते का? असा प्रश्न त्याने उपस्थित केला. त्यांनी भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्दही असेच केले असते का? मग त्यांनी आमच्या बरोबरच असे का केले. शेवटी तो म्हणाला, अजून वेस्टइंडीजकडे दोन सामने आहेत, जेणेकरून आम्ही इंग्लंड पेक्षा श्रेष्ठ ठरू.”

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ३११ धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडीजने आपल्या पहिल्या डावात ३७५ धावा करून पहिल्या डावात ६४ धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या डावात ६ विकेट्स गमावून ३४९ धावांवर डाव घोषित केला. विंडीजने आपल्या दुसऱ्या डावात ४ विकेट्स गमावून १४७ धावा केल्या. परंतु सामन्याचे ५ दिवस संपल्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!