Share

“…पण महाराष्ट्रात यश मिळेलच असं नाही”, गुलाबराव पाटलांचा भाजपला जोरदार टोला

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळालं म्हणजे भाजपला महाराष्ट्रातही यश मिळेलच असं नाही, असे पाटील म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गुलाबराव पाटील म्हणाले की,‘देशातल्या चार राज्यांत भाजपला निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. यामुळे नक्कीच त्यांची स्फूर्ती वाढली आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील निवडणुकीत ते बहुमत मिळवतील असा होत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांना दोन ते अडीच वर्षांचा काळ आहे. राजकारणात रोज बदल होत असतो. त्यामुळे राज्यांच्या निवडणुकांमध्ये यश मिळाले तर भाजपला महाराष्ट्रातही यश मिळेल असं नाही’, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्यातील सरकार विरोधकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र रचत असून या कामात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan) यांना हाताशी धरले आहे असा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देत पाटील म्हणाले की,‘या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यावर बोलणे उचित होणार नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यासंदर्भात विधानसभेत सोमवारी खुलासा करणार आहेत. त्यानंतर याप्रकरणातील नेमके सत्य काय ते बाहेर येईल. म्हणजेच दूध का दूध पानी का पानी होईलच.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!