Share

‘आप’ देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल; ‘आप’चा दावा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होताना दिसून येत आहे. तर ‘आप’ पक्ष सर्वाधिक जागांनी आघाडीवर आहे. यावरच आप नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनी ‘आप’ देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल असा दावा केला आहे.

“जनतेच्या खिशातून पैसे काढून हे नेते आपले महाल सजवत आहेत. ही सारी व्यवस्था बदलायला हवी. भारताच्या इतिहासातील आजचा दिवस खूप मोठा आहे. आगामी काळात काँग्रेसची जागा ‘आप’ असेल”, असे आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे.

तसेच आम आदमी पार्टीचे गोपाल राय यांनी “आतापर्यंतचे कल हे सकारात्मक आहेत. जे काही निकाल येतील तेही सकारात्मक असतील. पंजाबच्या जनतेचे आम्ही आभार मानतो. त्यांनी बदलाच्या दिशेनं आम्ही केलेल्या संकल्पाला पूर्ण केलं आहे” असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!