🕒 1 min read
पंजाब: पाच राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी सध्या सुरू आहे. यात आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये चांगलीच बाजी मारल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसने केलेल्या नेतृत्व बदल तसेच शेतकऱ्यांचा भाजपबद्दल असलेला आक्रोश या सगळ्यांचा फायदा आम आदमी पक्षाला झाल्याचे दिसत आहे. आप ८९ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपसोबत हातमिळवणी केली. या सगळ्याच परिणाम पंजाब येथील जनतेला ‘आप’ पक्ष एक चांगला पर्याय दिसला, असं म्हणायला काही हरकत नाही.
एक शहरी पक्ष म्हणून आम आदमी पक्ष ओळखला जातो. नवी दिल्ली सारख्या एका शहरावर सत्ता स्थापन केल्यानंतर एका राज्यात सत्ता स्थापन करणं हे आता मोठं आव्हान आम आदमी पक्षावर असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
पाच राज्यांच्या निवडणुकां संदर्भातील पहिल्या तासाभरातील १० मुद्दे
-
UP Results 2022 : “…हा सर्व मोदींचा करिष्मा”, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
-
भारत, पाकिस्तान ऑस्ट्रेलियात भिडणार?…पहा ऑस्ट्रेलिया बोर्ड काय म्हणालेय
-
UP Results 2022 : विरोधक अगोदरच आपल्या पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरत आहेत- सिद्धार्थ नाथ सिंग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
