Share

पाच राज्यांच्या निवडणुकां संदर्भातील पहिल्या तासाभरातील १० मुद्दे

Published On: 

🕒 1 min read

५ राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. पहिल्या तासाभराच्या मतमोजणी कुणाचा पगडा भारी व कोण पिछाडीवर? महत्त्वाचे 10 मुद्दे सविस्तर पहा..

१) सर्वात मोठी घडामोड गोव्यात घडताना दिसत आहे. गोव्यात कॉंग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा १४ जागांवर आघाडीवर आहे.

२) गोव्यात ममता बॅनर्जीची टीएमसी ४ जागांवर आघाडीवर आहे तर केजरीवाल्यांच्या आपला मात्र एकाही जागेवर आघाडी घेता आली नाही.

३) गोव्यात २ जागांवर इतर जण आघाडीवर आहेत, शिवसेनेला मात्र गोव्यात फार काही हाताला लागले आहे असे अजून तरी दिसून येत नाही.

४) गोव्यात सर्वांच लक्ष लागलेल्या उत्पल पर्रिकर यांनी पोस्टल मतदानात आधी आघाडी घेतली पण नंतर ते पिछाडीवर गेले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र आघाडीवर आहेत.

५) उत्तर प्रदेशात भाजपा दीडशेच्या घरात पण जागाचं नुकसान होताना दिसत आहे . तर अखिलेश यादव यांच्या सपान गेल्या वेळेसच्या तुलनेत चांगली आघाडी घेतलीय त्यांनी पहिल्या तासाभरात पाऊनशे जागांचा टप्पा ओलांडला.

६) पहिल्या तासाभरात उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला आघाडी पिछाडीच्या गणितात खातही उघडता आले नाही. फारशा प्रचारात न पडलेला मायावती यांच्या बीएसपीचे दोन उमेदवार आघडीवर

७) पंजाबमध्ये नवज्योतसिह तसचं कॅप्टन अमरिंदरसिंग हे पिछाडीवर राहिले. मुख्यमंत्री चन्नी यांनी मात्र दोन्ही जागांवर आघाडी घेतली.

८) पंजाबमध्ये आपचं अर्धशतकी आघाडी तर कॉंग्रेस आणि अकाली दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आघाडी, भाजप पंजाबमध्ये फक्त ४ जागांवर आघाडी.

९) अखिलेश यादव हे आघाडीवर राहिले, योगी आदित्यनाथ यांनीही आघाडी घेतली, शिवपाल यादव मात्र पिछाडीवर गेले.

१०) मणिपुरमध्ये भाजपन दणदणीत आघाडी घेतली तर कॉंग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या मणिपुरमध्ये अधिक, ती १० इतकी राहिली.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!