🕒 1 min read
नवी दिल्ली: गोव्यात सध्या काँग्रेस- भाजप (Congress- BJP) मध्ये चांगलीच लढाई दिसून येत आहे. गोव्यात भाजपचे मोन्सेरात आघाडीवर असून पणजी उमेदवार उत्पल पर्रीकर आता पिछाडीवर आहेत. कलांनुसार भाजप २१ जागांनी आघाडीवर असून काँग्रेस १२ जागांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप गोव्यात बहुमताच्या वाटचालीकडे दिसून येत आहे.
दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या पिछाडीवर असून ते साखळी मतदार संघातून पिछाडीवर आहेत. ते साखळी मतदार संघातून तीन वेळा निवडून आले आहेत. दरम्यान गोव्यात शिवसेना, भाजप आणि काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे गोव्याची निवडणूक सध्या प्रतिष्ठेची बनली आहे.
दरम्यान चार राज्यांत भाजप आघाडीवर असून भाजपचा फेवर दिसून येत आहे. तर पंजाब मध्ये आप पक्षाने मुसंडी मारली आहे. दरम्यान भाजप उत्तराखंड मध्येही आघडीवर असून तेथेही भाजप बहुमताच्या वाटचालीकडे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
Election Result 2022 : ज्याच्या ताब्यात उत्तर प्रदेश त्याच्या ताब्यात केंद्र सरकार- रावसाहेब दानवे
-
UP Result 2022 : युपीत भाजपला बहुमत; डबल सेंचुरी करत आघाडीवर
-
‘आमचं राजकारण नकलांवर नाही तर…’ ; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचा टोला
-
“बऱ्याच वर्षांपासून मनात होते की, डोंबिवलीत…” रहाणेने शेअर केला खास व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
