🕒 1 min read
मुंबई : मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी आणि मराठी रसिक गर्दी करत आहेत. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सिनेमागृहांमध्ये ‘पावनखिंड’च्या शोला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, अक्षय वाघमारे, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, मृणाल कुलकर्णी, वैभव मांगले यांसारख्या कलाकारांची मोठी फौजच या चित्रपटात पहायला मिळतेय. सध्या सोशल मीडियावर आणि संपूर्ण महाराष्ट्रात याच चित्रपटाला मिळालेल्या यशाची चर्चा आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ‘पावनखिंड’ या चित्रपटातील एका गाण्यावर चिमुकली डान्स करताना पहायला मिळतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CapQqaPpdRI/?utm_medium=copy_link
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ या गाण्याची क्रेझ पहायला मिळाली. कच्चा बदाम या गाण्यावर अनेकांनी इन्स्टा रिल्स व्हिडीओ बनवून पोस्ट केले. एकीकडे कच्चा बदामचा ट्रेंड सुरू असताना पावनखिंडमधील गाण्यावर नाचणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ पोस्ट करत चिन्मयने लिहिलं, ‘कच्चा बदाम नाही, शिवरायांच्या महाराष्ट्राची लेक’! चिन्मयने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘हे बघून वाटतं की तुम्ही आजच्या आणि पुढच्या पिढीसाठी खूप काही देत आहात आणि पुढेसुद्धा देणार’, अशी कमेंट एकाने केली. तर ‘घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत पावनखिंड या चित्रपटाचा परिणाम कसा झाला, हे यातून पहायला मिळत आहे. आणखी काय हवंय’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
