Share

सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचा आगामी ‘टायगर ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. सध्या ‘टायगर ३’ चित्रपटातील रिलीज डेटसोबत सलमान आणि कॅटरिनाची एक झलक पाहायला मिळाली आहे. नुकतेच सलमानने आपल्या इंन्स्टाग्रामवर आगामी ‘टायगर ३’  चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कॅटरिना काही लोकांना चाकूने मारण्याचा सराव करताना दिसत आहे. यावेळी सलमान मात्र, त्याच्या चेहऱ्यावर स्कार्फ घेवून एका टेबल्यावर आराम करताना दिसतो. कॅटरिनाचा हा साहसी, धाडसी लूक चाहत्‍यांच्‍या पसंतीस उतरला आहे.

या व्हिडिओ पुढे करॅटरिना सलमानला ‘आता तुझा नंबर आलाय’ असे म्हणते. तेव्हा सलमान त्याच्या स्टाईलमध्ये टेबलावरून उठतो आणि ‘टायगर नेहमीच तयार असतो’ असे तो म्हणतो. याशिवाय सलमान आणि कॅटची जोडी नेहमीच चाहत्यांना आकर्षण असते. त्यामुळे चाहते दोघांचा चित्रपट पाहण्यास आतूर असतात.

या धमाकेदार व्हिडिओमध्ये चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे, २१ एप्रिल २०२३ रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित हाेणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच्या कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले की, ‘आपण सर्वांनी स्वतःची काळजी घेऊ या. टायगर ३ हा चित्रपट २०२३ मध्ये येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. टायगर ३ सह यशराज फिल्म्सची ५० वर्षे साजरा करा.’सलमान खानच्या ‘टायगर ३’ चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते आतूरतेने वाट पाहत होते. मात्र, हा चित्रपट आता २०२३ ला ईदला पाहायला मिळणार आहे. सलमानचा ‘कभी ईद कभी दिवाळी’ ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!