Share

शेन वॉर्नने ‘ज्या’ खेळाडूला स्वार्थी म्हटले होते तोही आज दुःखात; म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शेन वॉर्नचे निधन झाले आहे. वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट चाहते आणि क्रिकेटरसिकांमध्ये शोककळा पसरली आहे. जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीने आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या वॉर्नने कसोटीत एकूण ७०८ बळी घेतले. कसोटीत वॉर्न हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. वॉर्नच्या जादूई गोलंदाजीची जादू आजही चाहते विसरलेले नाहीत. वॉर्नच्या अनुपस्थितीमुळे त्याचे जुने मित्रही त्याला मिस करत आहेत. त्याचवेळी, संपूर्ण कारकिर्दीत वॉर्नचा कर्णधार राहिलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यानेही या लेगस्पिनरला अखेरचा निरोप दिला आहे. वॉने वॉर्नच्या स्मरणार्थ लिहिले आहे. ‘अशा अनेक अविश्वसनीय आठवणी आणि क्षण जे कधीही विसरले जाणार नाहीत, तुझ्यासोबत खेळणे हा एक विशेषाधिकार आणि आनंद होता, माझे विचार आणि संवेदना वॉर्न कुटुंबासोबत आहेत. शांततेत विश्रांती घे.’

वॉर्नने स्टीव्ह वॉला स्वार्थी म्हटले होते.

स्टीव्ह वॉ (steve vaugh) एक असा खेळाडू आहे ज्याच्याबद्दल वॉर्नला बोलणे आवडत नव्हते. वॉर्नने आपल्या नो स्पिन या पुस्तकातही स्टीव्ह वॉचे वर्णन स्वार्थी क्रिकेटपटू असे केले आहे. नो स्पाइन या पुस्तकात वॉर्नने लिहिले की, “मला खराब फॉर्मचे कारण देत १९९९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीतून वगळण्यात आले होते. त्यावेळी वॉने मला साथ दिली नाही. या घटनेबाबत वॉर्नने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, जेव्हा संघ निवडीबाबत चर्चा झाली तेव्हा स्टीव्ह म्हणाला, ‘वॉर्नी, तू पुढची कसोटी खेळू नये असे मला वाटते.’

वॉर्नने याबद्दल पुढे सांगितले “मी त्यावेळी संघाचा उपकर्णधार होतो. मला स्टीव्ह वॉकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे मला लयीत यायला वेळ लागेल, मी स्वत:ला ग्रूमिंग करत आहे, असे आवाहनही मी त्यांना केले होते. एवढे सगळे सांगूनही मला वॉची साथ मिळाली नाही.” वॉर्नने लिहिले होते की, “निराशा हा शब्द इतका मजबूत नव्हता, जेव्हा कठीण प्रसंग आला तेव्हा त्यांनी मला साथ दिली नाही. आणि त्यामुळे मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. वॉर्नने त्याच्या पुस्तकात असेही लिहिले आहे की, वॉ माझा चांगला मित्र होता पण त्याने माझ्यावर विश्वास दाखवला नाही. ज्याचे मला दुःख राहील.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!