Share

सलमान खानसोबत चक्क लग्नाचे फोटो ? सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा

Published On: 

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान आणि सोनाक्षीच्या लग्नाचा एक फोटो व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये सलमानने सोनाक्षी सिन्हासोबत लग्न केल्याचे बोलले जात आहे.  फोटोमध्ये सलमान खान सोनाक्षी सिन्हाला अंगठी घालताना दिसत आहे.  त्याचवेळी सोनाक्षीच्या भांगात  सिंदूर दिसत आहे. हा फोटो मॉर्फ करून फोटोशॉपच्या सहाय्याने एडिट केल्याचे आढळून आले. आता या चित्रावर सोनाक्षी सिन्हा काय बोलली आपण पाहुया.

सलमानच्या आणि तिच्या लग्नाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोवर सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर कमेंट करताना तिची बाजू मांडली आहे. ती  म्हणाली – तू इतका मूर्ख आहेस की वास्तविक आणि मॉर्फ केलेले फोटो यात फरक कळत नाही. यासोबतच तिने  कमेंटमध्ये हसणारा इमोजीही वापरला आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.  चित्रावर कमेंट करताना एकाने लिहिले – तुमची कला चांगल्या ठिकाणी वापरा. एखाद्याचे चित्र असे मॉर्फ करणे चुकीचे आहे.  त्याचवेळी एका यूजरने लिहिले – त्याला लक्ष हवे होते आणि सोनाक्षीने त्याला तेच दिले.

सत्य काय आहे

सलमान आणि सोनाक्षीचे लग्न झालेले नाही.  सलमान खान स्वत:ला सिंगल असल्याचे सांगत आहे पण तो अनेकदा त्याची मैत्रिण युलिया वंतूरसोबत दिसतो.  त्यामुळे सलमान आणि युलिया रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे.  युलियापूर्वी सलमान खान अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता .त्याचबरोबर सोनाक्षीचे नाव झहीर इक्बालसोबत जोडले जात आहे.  मात्र, सोनाक्षीने झहीरसोबतच्या नात्याचाही  इन्कार केला आहे.  दबंग गर्लने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ती झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये नाही.  झहीर हा तिचा फक्त चांगला मित्र आहे. दोघंही दुसऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना कोणत्यातरी चाहत्याने हा प्रकार केला असावा. असे सोनाक्षीने सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!