Share

Disha Salian Case : नारायण राणे मालवणी स्टेशनला हजर; आपली बाजू मांडणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिशा सालियन बदनामी प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने नारायण राणे आणि नितेश राणे यांना मालवणी पोलिसांनी दहा मार्चपर्यंत अटक करू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. तर आज नारायण राणे आणि नितेश राणे मालवणी पोलीस स्टेशनला हजर झाले आहेत. ते आपली बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.

दरम्यान दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली तसेच ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेत आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहन केलं होतं. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर ही माहिती खोटी असल्याचे म्हटले होते. त्यामुळे दिशा सालियनची बदनामी केल्या कारणाने राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नितेश राणेंचा ट्वीट करत इशारा-

आज सकाळीच नितेश राणे यांनी ट्वीट करत इशारा दिला होता. “खेळ तुम्ही सुरु केला, संपवणार आम्ही.”, असे ट्वीट त्यांनी केले होते. सोबतच त्यांनी #JusticeForDishaSalian असेही म्हटले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होऊन दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याबाबत चौकशी केली जात होती. त्यात दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यातच नारायण राणे यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती.

नारायण राणेंचे ‘ते’ ट्वीट-

खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!