Share

Maratha Reservation: संभाजीरजेंच्या डोळ्यात अश्रू; तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: खासदार संभाजीराजे भोसले यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. संभाजी राजे यांची प्रकृती बिघडली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र, सरकारकडून अजूनही कोणतंही ठोस आश्वासन देण्यात आलेलं नाही. संभाजीराजे यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलं आहे.

सांभाजीराजे कार्यकर्त्यांशी बोलत असताना त्यांचा आवाज क्षीण झालेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान कार्यावर बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यामुळे त्यांनी तात्काळ हाताने डोळे पुसण्यास सुरुवात केली. अनपेक्षितपणे घडलेला हा प्रसंग पाहून आझाद मैदानात जमलेले शेकडो कार्यकर्तेही हेलावून गेले. राजेंच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून संपूर्ण परिसरात शांतता पसरली होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics Video

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या