मुंबई: भारताने रविवारी धर्मशाला येथे श्रीलंकेचा ३-०असा व्हाईटवॉश पूर्ण केल्यानंतर सलग तीन T20I मालिका क्लीन स्वीप करून, सर्वाधिक सलग T20I विजयांच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ अलिकडच्या काळात प्रभावी ठरला आहे आणि, मायदेशात मालिका जिंकूनही, या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेचे प्रमुख दावेदार होण्याची चिन्हे आधीच दिसत आहेत. गेल्या वर्षी T20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलँडला पराभूत केल्यानंतर, भारताने त्यांचे पुढील १२ सामने जिंकले आहेत. मात्र माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांना संघातील एक चिंता अजूनही सतावत आहे.
डेथ ओव्हर्समध्ये काही धडाकेबाज फलंदाजीमुळे श्रीलंकेने दुसऱ्या T20I मध्ये १८३-५ धावा केल्याबद्दल बोलताना गावस्कर (sunil gavaskar) म्हणाले की, “भारताला “डेथ-ओव्हरच्या गोलंदाजांची काळजी करावी लागेल. हा एक मुद्दा आहे की भारताला कार्पेटच्या खाली स्वीप करणे परवडत नाही. त्यांना डेथ-ओव्हरच्या गोलंदाजांची चिंता करावी लागेल. यात पहिली १० आणि शेवटची आठ ओव्हर कोणी टाकली पाहिजेत हेही लक्षात घ्यायला हवे. या अशा समस्या आहेत ज्यांचा भारताने विचार करणे आवश्यक आहे.”
सुनील गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संघाची डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी होत नाहीये. भारताची रणनीती अजून बदलायला हवी असे त्यांचे मत आहे. सोबतच त्यांनी पुढे बुमराह (jasprit bumrah) विषयी सुद्धा वक्तव्य केले आहे. “डेथ ओव्हरमध्ये खराब गोलंदाजी हे चिंतेचे लक्षण नाही, परंतु ते नियमितपणे होणे परवडत नसल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष्य द्यायला हवे. शेवटच्या पाच-सहा ओव्हरमध्ये अशा भागीदारी असू शकतात ज्यात तुम्हाला ८०-९० धावा मिळतील” त्यांनी दुसऱ्या सामन्यात बुमराह विरुद्ध शनाकाची फटकेबाजी बघत डेथ ओव्हरमधील गोलंदाजी विषयी चिंतेचे स्पष्टीकरण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या वक्तव्यावर मिटकरींची प्रतिक्रिया; म्हणाले,“तुमच्या ‘चहा’छाप सैनिकांनी…”
- कोश्यारींनी केलेल्या व्यक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून पुणे महापालिकेत आंदोलन
- “आणि तो आफ्रिकेसाठी खेळतानाही ५० हजार प्रेक्षक एबीडीचे नाव ओरडत होते”; विराट कोहलीने सांगितले चाहत्यांचे प्रेम
- भगतसिंग कोश्यारींविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक
- “महाराष्ट्रात निवडणुका असत्या तर ‘ऑपरेशन सह्याद्री’ असतं”, केंद्र सरकारला राऊतांचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

