🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहे. पंजाब,उत्तराखंड, गोवा या राज्यात निवडणूका झाल्या आहेत. तर आज मणिपूर राज्याच्या विधानसभेसाठी निवडणूका होत आहेत. उत्तरप्रदेश राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी काही टप्प्यांचे मतदान अजून बाकी आहे. या सर्वच राज्यात सर्वच पक्ष आपल्या आपल्या परीने प्रचार करत आहेत. काही पक्षांकडून वादग्रस्त वक्तव्य पण होत आहेत.
त्यातच मध्यंतरी भारतीय जनता पक्षाचे उत्तरप्रदेश मधील आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांनी जे हिंदू मला मत देत नाहीत, त्यांच्यामध्ये मुस्लिमांचे रक्त आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. राघवेंद्र प्रताप सिंह यांचे हे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. आचारसंहितेचे उल्लंघन आणि समाजात द्वेष पसरवल्याबद्दल आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे भाजपचे आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती. उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगरमधील डुमरियागंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांच्या प्रचारावर भारतीय निवडणूक आयोगाने 24 तासांची बंदी घातली आहे.
मुस्लिम समाजाप्रती वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आणि एकूणच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने भाजप आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांच्या प्रचारावर २४ तासांची बंदी घातली आहे. या २४ तासांच्या कालावधीत राघवेंद्र प्रताप सिंह कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करू शकणार नाहीयेत.
महत्वाच्या बातम्या :
- विराट कोहलीने सुरु केली ‘१००’ व्या कसोटी सामन्यासाठी प्रॅक्टिस
- राज्यपालांच्या वक्तव्यावर मिटकरींची प्रतिक्रिया; म्हणाले,“तुमच्या ‘चहा’छाप सैनिकांनी…”
- PSL 2022: मुलतान सुल्तानसला पराभूत करत लाहोर कलंदर्स पहिल्यांदाच ठरले पीएसएलचे विजेते
- IPL 2022: मयंक अग्रवाल ‘पंजाब किंग्ज’ चा नवा कर्णधार म्हणून घोषित
- भाजपने आता नवीन शिवव्याख्याते निर्माण केले आहेत- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
