Share

पुण्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित होणार; मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

Published On: 

पुणे : पुणे शहरात अनेक पक्षी आणि प्राणी आपल्याला पाहावयास मिळतात. पुण्यात दोन प्रसिद्ध अभयारण्य आहेत. एक पक्षांसाठी प्रसिद्ध आहे, तर दुसर प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य  म्हणजे डॉ.सलीम.अली पक्षी अभयारण्य. आता हे डॉ.सलीम.अली पक्षी अभयारण्य राज्याच्या वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली.

पुण्यातील येरवडा येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने पाठपुरावा करून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अभयारण्य परिसराची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती, या विनंतीला मान देऊन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज येरवडा येथील पक्षी अभयारण्यात पाहणी करायला आले होते. यावेळी येथील पक्ष्यांना सुरक्षित अधिवास प्राप्त होण्यासाठी महसूल विभागाकडील येरवड्यातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य परिसरातील क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची घोषणा आज आदित्य ठाकरे यांनी केली. एकूणच परिसराची पाहणी केल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला. आदित्य ठाकरे यांनी आज रविवार सकाळी परिसराची पाहणी केली व त्यानांतर वन विभागाकडे अभयारण्य हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले कि, ” डॉ.सलीम.अली पक्षी अभयारण्य परिसरातील पक्ष्यांना सुरक्षित अधिवास मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या परिसरात ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केली आहेत ती वेळेत उठवण्यात यावी याकरता मी लवकरच कार्यवाहीचे आदेश देणार आहे. तसेच परिसराची सुरक्षा गरज लक्षात घेऊन संरक्षणाच्या दृष्टीने परिसरात पोलिसांची गस्त देखील वाढविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पुणेकर नागरिक पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत असून ते पर्यावरणाची जीवा पाड काळजी घेत असतात. २०३० पर्यंत पुणे शहर हे कार्बन न्यूट्रल शहर व्हावे यासाठी पण आपण प्रयत्न करायला हवेत असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!