🕒 1 min read
पुणे : पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन महाराष्ट्र राज्यातील मोठ्या आणि बऱ्यापैकी श्रीमंत असणाऱ्या महानगरपालिका गेले कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात होत्या. पुणे महानगरपालिका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा बालेकिल्ला होय. परंतु, २०१७ फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी पक्षाच्या हातातून पुणे महानगरपालिकेची सत्ता खेचून घेतली.
येत्या काही दिवसातच राज्य निवडणूक आयोग पुणे- मुंबई सह राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू शकतो. पुणे महानगरपालिकेने १ फेब्रुवारी रोजी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नवीन प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. महाराष्ट्र राज्यात जो पक्ष सत्तेत असतो त्या पक्षाची छाप नेहमीच पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर पडत असते. यावेळी पण असच घडलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची छाप पडली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला सोयीची प्रभाग रचना करून घेतली आहे आसा आरोप पुणे शहरात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष आणि मनसे कडून केला जात आहे. १ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचना बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात मात्र उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १२२ नागरसेवक निवडून येतील असा आत्मविश्वास दाखवला आहे. प्रशांत जगताप यांच्या या विधानावर पुणे शहर काँग्रेस आणि शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन प्रारूप प्रभाग रचनेमुळे पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीकरता अनुकूल वातावरण तयार झाले असले तरी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि इतर पक्षातील विद्यमान नगरसेवक व बडे नेते आपल्या पक्षाकडे वळवल्याशिवाय पुण्यात आपली सत्ता येणार नाही हे राष्ट्रवादी पक्षाला पण ठाऊक आहे. त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीकरता शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांशी आघाडी करायची कि नाही ही चर्चा सध्या पुण्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वर्तुळात सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘तो’ तर चहलच्या खिशात; डीजे ब्रावोचा विंडीज कर्णधारावर निशाणा
- कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- शिवसेनेचे २०१७ साली ‘करून दाखवलं’ आणि आता २०२२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी नवीन घोषवाक्य एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही- अजित पवार
- “कधी जीभ तर कधी पाय घरसणाऱ्याचा भाजप सत्कार करतय”, रुपाली पाटलांचा टोला
- “दुर्दैवाने काही लोक…”; हिजाब वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
