🕒 1 min read
मुंबई : पाकिस्तान आणि भारताचे राजकीय संबंध बिघडले आहेत. पाकिस्तान सतत करत असलेल्या अतिरेकी कारवाईमुळे भारताने पाकिस्तानशी सर्वच प्रकारचे संबंध तोडले आहेत. भारत सध्या पाकिस्तानशी राजकीय, क्रीडा, कला किंवा व्यापार अश्या कुठल्याच प्रकारे संबंध ठेवत नाहीये. भारताचे पाकिस्तानशी राजकीय संबंध बिघडले असले तरी याचा क्रीडा क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी भारत,पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार संघात चौरंगी क्रिकेट मालिका आपण सुरु करायला हवी असा प्रस्ताव बीसीसीआय समोर मांडला होता. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पीसीबीच्या या प्रस्तावासाठी अनुकूल नसल्याचे दिसत आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आज पीसीबीच्या प्रस्तावासाठी आम्ही इच्छुक नसल्याचे संकेत दिले आहेत. क्रिकेटचा विस्तार हेच जगभरातील क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांच लक्ष्य असलं पाहिजे. छोट्या व्यावसायिक उपक्रमांपेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे, असं जय शाह यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं. “मी आयआयसीला चार देशांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव देईन. या स्पर्धेतून जो नफा होईल, तो टक्केवारीच्या आधारावर आयसीसीच्या सदस्य देशांमध्ये वितरीत करु” असे रमीझ राजा म्हणाले होते. भारत-पाकिस्तानमध्ये 2012-13 पासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेली नाही.
सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशात गेल्या कित्येक वर्षात क्रिकेट मालिका झालेली नाही. मात्र आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी भारत पाकिस्तानच्या कुठल्याही प्रस्तावास होकार देणार नाही याचे आज संकेत दिले आहेत. त्यामुळे भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशात एकदिवसीय सामन्यांची कुठलीही मालिका होण्याची शक्यता आता मावळली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- तेव्हा लता मंगेशकर म्हणाल्या होत्या मी मुंबई सोडून जाईन
- धर्म संसदेतील वादग्रस्त वक्तव्यांवर आरएसएस विश्वास ठेवत नाही- मोहन भागवत
- यापुढे सातबारा उतारा बंद करुन केवळ प्रॉपर्टी कार्ड ठेवणार; राज्य शासनाचा निर्णय
-
असदुद्दीन ओवेसींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अमित शहा करणार संसदेत निवेदन
- “लता मंगेशकर यांच्या निधनाने गंगा-यमुनेचा प्रवाह थांबला, हिमालयही दुःखाने वितळून गेला”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
