नवी-दिल्ली : ‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी(Asaduddin Owaisi) यांच्या वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी(३ फेब्रु.) सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आज(७ फेब्रु.)केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) हे राज्यसभेमध्ये भाष्य करणार आहेत.
आज अमित शहा हे राज्यसभेमध्ये ११ वाजेच्या सुमारास तर दुपारी ४ वाजता लोकसभेमध्ये ओवैसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबारासंदर्भात माहिती देणार आहेत. त्यामुळे यावेळी अमित शहा काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी मिळाली असून चौकशीत त्यांनी ओवेसींचे भाषण ऐकून अस्वस्थ झालो आणि जीवे मारण्याचा कट रचला अशी कबुली दिली आहे. मुख्य आरोपी सचिनने सांगितले की, मला मोठा राजकीय नेता व्हायचे आहे. ओवेसीचे भाषण ऐकून मी अस्वस्थ झालो. त्यामुळेच जवळचा मित्र शुभमसोबत ओवेसीच्या हत्येचा कट रचला होता, मी जेव्हा ओवेसींवर गोळीबार केला तेव्हा ते खाली वाकले. त्यामुळे मी खाली गोळी झाडली आणि मला वाटले की त्यांना गोळी लागली आहे. मग मी पळून गेलो, असेही आरोपींनी पोलिसांना सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
“लता मंगेशकर यांच्या निधनाने गंगा-यमुनेचा प्रवाह थांबला, हिमालयही दुःखाने वितळून गेला”
संजय राऊतांची पत्रकार परिषद रद्द; ट्वीट करत म्हणाले “लवकरच मी रोखठोक बोलेन”
मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी मुळीच खपवून घेणार नाही- रक्षा खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

