Share

तेव्हा लता मंगेशकर म्हणाल्या होत्या मी मुंबई सोडून जाईन

Published On: 

मुंबई: भारतरत्न, गाणकोकिळा लता मंगेशकर यांचे वयाच्या ९३ वर्षी काल रविवार दि. ०६ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालायत निधन झाले. त्यावेळी संपूर्ण भारत देशाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनेक दिग्गज नेते, कलाकार मंडळी, तसेच संगीत विश्वातील मोठी मंडळी आणि लाखों रसिकांनी जड अंतकरनाने त्यांना निरोप दिला.

लता मंगेशकर ह्या ताडदेव भागात पेड्डर रोडवरील प्रभू कुंज सोसायटीमध्ये रहात होत्या. हजीअली दर्गा ते गिरगाव चौपाटी असा ४.१ किलोमिटर लांबीचा एक पूल (Flyover) पेड्डर रोड वरुन जाणार होता. जेणेकरून वाहतूक सुरळीत व्हावी आणि प्रवास लवकर संपवा. परंतु पेड्डर रोड समोरून जाणाऱ्या पूलाला लता मंगेशकर यांनी विरोध केला होता. त्यांनी जर माझ्या घरासमोरून कोणता पूल गेला तर मी मुंबई सोडून पुणे किंवा कोल्हापूरला जाऊन राहीन असा ईशारा दिला होता. त्यावेळी पेड्डर रोडवरील अनेक रहिवाश्यांनी देखील या पूलाला विरोध केला होता.

त्यावेळी तत्कालीन अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी लता मंगेशकर यांची भेट घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे ठरवले. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख याची यासंदर्भात भेट देखील घेतली होती. त्यानंतर तिथे लता मंगेशकर आणि पेड्डर रोडवरील स्थानिक राहिवाश्यांच्या विनंतीवरून तेथे कोणताही पूल अद्याप बांधला गेला नाही.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!