मुंबई : हरीद्वार येथे झालेल्या धर्म संसदेत काही कथित साधू महंतांनी वादग्रस्त वक्तव्ये केले होते. यामुळे देशभरात मोठा वाद उद्भवला होता. याप्रकरणी काही साधूंवर कारवाईदेखील करण्यात आली. यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या विधानांशी आपण असहमत असून हे हिंदुत्व नाही, हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे लोक त्या विधानांचं कधीच समर्थन करणार नाहीत असे मोहन भागवत म्हणाले. ते रविवारी मुंबईतील ‘राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्व’ या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
पुढे मोहन भागवत म्हणाले, धर्म संसदेत केलेली विधानं हिंदूत्वाला शोभेसे नाहीत. मी कधी रागात काही बोललो असेल तर ते हिंदुत्व नाही. आरएसएस किंवा हिंदुत्वाचे अनुयायी अशा वत्कव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. वीर सावरकरांनी हिंदू धर्मातील समुदायाच्या एकतेबद्दल, त्यांना संगठित करण्याबद्दल मत विचार मांडला होता. त्यांनी त्या गोष्टी भगवद गीतेचा संदर्भ देत मांडल्या होत्या. कुणालाही संपवण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी ते बोलले नव्हते. असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

