Share

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचा राहणे आणि पुजाराला ”मोलाचा” सल्ला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ६ फेब्रुवारी पासून वेस्टइंडीज संघ भारताचा मर्यादित षटकांचा दौरा करणार आहे. या वेस्टइंडीजच्या भारत दौऱ्यात ३ एकदिवसीय सामने तर ३ टी-२० सामने होणार आहेत. त्यानंतर श्रीलंका संघ भारताचा टी-२० आणि कसोटी सामन्यांसाठी भारत दौरा करणार आहे. या श्रीलंकेच्या भारत दौऱ्यात २ कसोटी सामने होणार आहेत. एक सामना बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे, तर दुसरा एकदिवसीय सामना मोहाली येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडूंची निवड होणार नाहीये यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा हे ते दोन दिग्गज भारतीय संघातील कसोटी खेळाडू होय. १० फेब्रुवारी पासून भारतातील सर्वात जुनी कसोटी स्पर्धा पुन्हा सुरु होणार आहे.

२ वर्षाच्या खंडानंतर आता २०२२ मध्ये पुन्हा रणजी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ही २०२२ ची रणजी स्पर्धा २ टप्यात होणार आहे. रणजी स्पर्धेमधील खेळ बघूनच आपण आगामी श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघ निवड करणार आहोत अशी घोषणा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केली आहे.

तर आगामी रणजी स्पर्धेत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे यांनी चांगला खेळ करून पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवावे असे सौरव गांगुली यांनी म्हंटले आहे. स्वतः सौरव गांगुली यांनी २००८ मध्ये देशातील सर्वात जुनी क्रिकेट स्पर्धा असणारी रणजी स्पर्धा खेळून भारतीय कसोटी संघात यशस्वी पुनरागमन केले होते. रणजी स्पर्धेबद्दल बोलताना सौरव गांगुली यांनी यंदाच्या आयपीएल स्पर्धेबाबत पण वक्तव्य केले आहे. भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाट ओसरत असून आपण या वर्षीच्या आयपीएलचे आयोजन भारतातच शक्यतो पुणे आणि मुंबई या दोन शहरातच करणार आहोत असे देखील म्हंटले आहे.

          महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!