पंजाब : पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगायलाही सुरुवात झाली आहे. असे असतांनाच आता पंजाब काँग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदावरुन वातावरण तापलेले बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू(Navjyot Singh Siddhu) आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी(Charanjit Singh Channi) आमने-सामने आले असून याविषयी बोलत असतांना पंजाबमध्ये हायकमांडला नेहमी कमकुवत मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायचा असतो, असे वक्तव्य सिद्धू यांनी केले आहे.
६ फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी हे पंजाब दौऱ्यावर येणार असून यावेळी ते पंजाब काँग्रेसमधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याची घोषणा करणार आहे. परंतु, राहुल गांधींनी घोषणा करण्यापूर्वीच नवज्योत सिंह सिद्धू यांनी हायकमांडला नेहमी पंजाबमध्ये कमकुवत मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायचा असतो. जो हायकमांडच्या आदेशावर नाचेल, असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, पुढे सिद्धू म्हणाले की,‘हायकमांड जे निर्णय घेतील तो मला मान्य असून काँग्रेस हायकमांड अतिशय हुशार आहे’, असे सिद्धू म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- राजकीय द्वेषापोटी भकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वेठिला धरू नये- अतुल भातखळकर
- डिसले गुरुजी तीन वर्ष गैरहजर असताना त्यांना वेतन का? मुख्याध्यापकांना शिक्षण विभागाची नोटीस
- सत्तेचा गैरवापर करायचाच असता तर नितेश राणे यांना रुग्णालयात नव्हे तर तुरुंगातच ठेवले असते- दीपक केसरकर
- “सरकराच्या देशद्रोहावर बोलणे म्हणजेच ‘देशद्रोह’ असा नवा फंडा”
- सुजित पाटकरविरुद्ध पुण्यातील जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

