🕒 1 min read
मुंबई : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये आठ फायनल खेळून चार विजेतेपद जिंकणारा भारतीय संघ स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे .आज भारतीय संघ पुन्हा पाचव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. यश धूलच्या कर्णधारपदाखाली भारतीय युवा संघ इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरेल.
स्पर्धेच्या सुरुवातीलाच कोरोना संसर्गाशी झुंज देत असतानाही भारतीय संघाने झुंजार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. यामुळे खेळाडूंची प्रतिभा आणि संघाची प्रतिभा दिसून आली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब सुरुवातीनंतर यश धुल आणि शेख रशीद यांनी ज्या प्रकारे डाव हाताळला त्यावरून त्यांची परिपक्वता दिसून आली. या स्पर्धेत ५५.६० च्या सरासरीने २७८ धावा करणाऱ्या अंगक्रिशने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल १०.७५ च्या सरासरीने १२ बळी घेऊन संघासाठी आघाडीवर आहे.
It's India vs England in the Final of U-19 World Cup!
????????????????????????????????????#india #teamindia #england #indvseng #u19 #final #trophy #cricketuniverse #captains pic.twitter.com/Kiecf1LaX2— Cricket Universe (@CricUniverse) February 4, 2022
२००० मध्ये मोहंमद कैफच्या नेतृत्वात भारताने पहिला अंडर १९ वर्ल्डकप जिंकला होता. तर दुसरा वर्ल्डकप विराट कोहली यांच्या नेतृत्वात २००८ मध्ये आला. तिसरा उन्मुक्त चंदने २०१२ मध्ये तर पृथ्वी शॉने २०१८ मध्ये जिंकून दिले. आता यश धूल पाचवा कर्णधार बनणार का या कडे क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “सरकराच्या देशद्रोहावर बोलणे म्हणजेच ‘देशद्रोह’ असा नवा फंडा”
- महाविकास आघाडीचे मंत्री घरात बसून कारभार हाकत आहेत; भातखळकरांची टीका
- “योगी आदित्यनाथ ‘रिव्हॉल्वर’ आणि ‘रायफल’ धारी संन्याशी”, भातखळकरांनी फोटो पोस्ट करत केले कौतुक
- राहुल गांधींचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच- संजय राऊत
- ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टिन लँगर यांनी दिला राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
