🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व महाविद्यालये आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच परीक्षाही ऑनलाईन घेण्यात येणार आहे. असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहिर केले आहे. यावर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. महाभकास आघाडीला ‘क्लास पेक्षा ग्लास’ महत्वाचा, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
शाळा बंद आणि बार सुरू..
म्हणजे या महाभकास आघाडी सरकारला "क्लास पेक्षा ग्लास" महत्त्वाचा वाटतो…
वाह रे वाह ठाकरे सरकार…
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 8, 2022
सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘शाळा बंद आणि बार सुरू, या महाभकास आघाडीला ‘क्लास पेक्षा ग्लास’ महत्वाचा. म्हणजे या महाभकास आघाडी सरकारला “क्लास पेक्षा ग्लास” महत्त्वाचा वाटतो. वाह रे वाह ठाकरे सरकार.’, अशी खोचक टीका सदाभाऊंनी केली आहे.
उदय सामंत यावेळी म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी विद्यापीठ नाही तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय काल मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे.
कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे वाढता कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालये बंद केली तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
महत्वाच्या बातम्या
- आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत- नितीन गडकरी
- ”KGF” या एकाच चित्रपटाने सुपरस्टार बनलेला यश आज साजरा करतोय त्याचा ३५ वा वाढदिवस
- “पंतप्रधान ओबीसी असतांना त्यांच्याकडून समाजाला अनेक आशा होत्या, परंतु…”
- नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी गंभीर बाब- देवेंद्र फडणवीस
- “तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करताय त्याचं आम्ही अगोदरच..” ममता बॅनर्जीं मोदींवर कडाडल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
