Share

”KGF” या एकाच चित्रपटाने सुपरस्टार बनलेला यश आज साजरा करतोय त्याचा ३५ वा वाढदिवस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेता यशने (yash) प्रशांत नील दिग्दर्शित ”KGF Chapter 1” या चित्रपटाच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसा उमटविला आहे. आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यशचा जन्म ८ जानेवारी १९८६ रोजी झाला. अभिनेता यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा (Naveen Kumar Gowda) असून त्याचे वडील अरुण कुमार (Arun Kumar) कर्नाटक परिवहन सेवेत चालक आहेत आणि आई पुष्पा गृहिणी आहेत. यशने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मोग्गीना मनसू (२००८) मधून केली होती. यशने राजधानी, मिस्टर अँड मिसेस रामाचारी आणि किरतका सारखे चित्रपट केले असले तरी, त्याला खरी ओळख KGFचित्रपटाने दिली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊ या.

दरम्यान यशने अशोक कश्यप दिग्दर्शित ‘नंदा गोकुळा’ (‘Nanda Gokula’) या टेलिव्हिजन मालिकेतून आपल्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरुवात केली. चित्रपटसृष्टीत त्यांना यश ‘रॉकी’ या नावाने ओळखले जाते. यशचे बालपण म्हैसूर येथे गेले जेथे त्याचे शालेय शिक्षण महाजन हायस्कूलमध्ये झाले. त्याच्या अभ्यासानंतर, तो बिनाका नाटक मंडळात सामील झाला. यशने २०१३ सालानंतर यशाचे शिखर उंचावत गेले. त्यानंतर २०१८ मध्ये रिलीज झालेला KGF हा कन्नड सिनेमातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट होता. या चित्रपटाने जगभरात २५० कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यश हा एक प्रसिद्ध चेहरा बनला. आज यशच्या ‘KGF: Chapter 2’ ची देशभर प्रतीक्षा आहे.

आज यश सुमारे ५० कोटींच्या मालमत्तेचा मालक असून यशचा बंगळुरूमध्ये सुमारे चार कोटी रुपयांचा आलिशान बंगलाही आहे. तसेच यशने गेल्या वर्षीच दुसरे घर घेतले होते. यशने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘त्यांचे वडील अजूनही बस ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. यश हे सामाजिक कार्यासाठीही ओळखले जातात. २०१७ मध्ये त्यांनी यश मार्ग फाउंडेशन सुरू केले. या फाऊंडेशनने कोप्पल जिल्ह्यात चार कोटी रुपये खर्चून एक तलाव बांधला आहे, ज्यातून लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळते.

यशने त्याची सह-अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले. दोघांनी पहिल्यांदा मिस्टर आणि मिसेस रामाचारीला सेटवर भेटले. दोघांची एंगेजमेंट १२ ऑगस्ट २०१६ रोजी गोव्यात झाली होती. त्यानंतर 9 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. इतकंच नाही तर यशने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी संपूर्ण कर्नाटकाला आमंत्रित केलं होतं. दोघांना दोन मुले आहेत. आता यशच्या आगामी ‘KGF: Chapter 2’ ची देशभर प्रतीक्षा असून या चित्रपआबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!