🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल(Mahatma Gandhi) अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी याविषयी भाष्य केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना गडकरी म्हणाले की,’अशा प्रकरणांमध्ये कायद्याला त्याचे काम करू दिले पाहिजे. हरिद्वार आणि रायपूरमध्ये जे काही घडले ते नाकारले पाहिजे आणि त्याला महत्त्व दिलं जाऊ नये. आमच्या राजांनी कधीही कोणाची प्रार्थनास्थळे तोडली नाहीत. आम्ही विस्तारवादी नसून संपूर्ण जगाचे कल्याण झाले पाहिजे, असे आम्ही मानतो. केवळ विश्वाचेच नाही, तर प्राण्यांचेही कल्याण व्हावे, असे आम्ही मानतो, हीच आपली संस्कृती आहे. म्हणूनच हा विचार मुख्य आहे. अशा परिस्थितीत कोणी विरोधात बोलले तर ती आपली मुख्य विचारधारा नाही, त्याला महत्त्व देऊ नये’, असे गडकरी म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कायदा आपले काम करेल. ज्याला कायद्यात अधिकार आहे, तो त्याच्या आधारे करेल. आपण सहिष्णुता आणि धर्माप्रती आदर राखला पाहिजे, सर्व धर्म आणि लोक समान आहेत’, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया;म्हणाले…
- पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे नाही – संजय राऊत
- …त्यामुळे कॅ.अमरिंदर यांचा बार फुसका आहे हे समोर आले- संजय राऊत
- “पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा मोदींना भीती वाटली नाही, पण…”
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
