🕒 1 min read
नवी दिल्ली: बंगालमध्ये एका रुग्णालयाच्या उदघाटनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे असलेल्या चित्तरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या दुसऱ्या भागाचे व्हिडीओ कॉन्फ्रंसिंगच्या माध्यमातून उदघाटन केले. यावेळी ममता बॅनर्जीदेखील उपस्थित होत्या.
मात्र कार्यक्रमातच ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) नाराजी व्यक्त केली. नरेंद्र मोदी ज्या रुग्णालयाचे उदघाटन करत आहेत. त्याच्या कॅम्पसचे आम्ही अगोदरच उदघाटन केले आहे, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी कार्यक्रमातच मोदींवर नाराजी दाखवल्यामुळे त्या चर्चेत राहिल्या.
सोबतच ममता बॅनर्जी सूत्रसंचालकांवरही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या आरोग्य मंत्र्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मला दोन वेळा फोन केला. मी विचार केला की, कोलकातामध्ये कार्यक्रम आहे. तसेच पंतप्रधानांनी रस घेतला आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असा विचार मी केला. मात्र मी मोदींना हे सांगू इच्छिते की, या रुग्णालयाचे उदघाटन मी आधीच केले होते. अशी जाहीर नाराजी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या:
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी तुषार भोसलेंनी केला महामृत्यूंजय मंत्रजाप
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “ताफा अडवल्यानंतर मोदींना कोणी दगड मारला की त्यांना दुखापत झाली?”
- टक्कलपण आणि केस गळती बनला दक्षिण कोरियाचा निवडणूक मुद्दा; नेमके प्रकरण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
