मुंबई : देशाचे पंतप्रधान ओबीसी समाजाचे असतांना त्यांच्याकडून या समाजाला अनेक आशा होत्या. परंतु या देशातील सर्व ओबीसींच्या त्यांच्याप्रती जी आस्था व अपेक्षा होती ती भंग झाली. आणि ओबीसी समाजाचा भ्रमनिरास झाला. अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच त्यांनी वैद्यकिय क्षेत्रातील ओबीसी आरक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
याबाबत विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केले आहे, ‘सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणामध्ये २७ टक्के आरक्षण दिल्याने ओबीसी समाजमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयाने ओबीसी, विमुक्त भटक्या जाती (VJNT) व इतर समाजातील तरुणांना मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स होण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो निर्णय हा खऱ्या अर्थाने ओबीसीला न्याय देणारा, ओबीसीला हक्क देणारा व ओबीसींच्या घटनेतील तरतुदींना लागू करणारा निर्णय आहे.’ अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली.
देशाचे पंतप्रधान @narendramodi #ओबीसी समाजाचे असतांना त्यांच्याकडून या समाजाला अनेक आशा होत्या. परंतु या देशातील सर्व ओबीसींच्या त्यांच्याप्रती जी आस्था व अपेक्षा होती ती भंग झाली. आणि ओबीसी समाजाचा भ्रमनिरास झाला. (4/5)
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 8, 2022
विजय वडेट्टीवार यांनी केंद्रसरकारवर यापूर्वी ट्विट करत टीका केली होती. वडेट्टीवार म्हणाले, ‘ओबीसी समाज से उनका हक ना कोई छीन सका था ना ही कोई छीन सकेगा. हमारे संघर्ष के आगे सरकारों को झुकना पड़ेगा और ओबीसी समाज को उनका हक देना पड़ेगा.’
महत्वाच्या बातम्या
- “बुलेटप्रूफ कवच असलेल्या गाड्यांमुळे नव्हे, तर देवकृपेने आपले पंतप्रधान वाचले”
- पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी तुषार भोसलेंनी केला महामृत्यूंजय मंत्रजाप
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत बघणाऱ्या मुर्दाड सरकारचा तीव्र निषेध’, भातखळकरांचा हल्लाबोल
- “ताफा अडवल्यानंतर मोदींना कोणी दगड मारला की त्यांना दुखापत झाली?”
- टक्कलपण आणि केस गळती बनला दक्षिण कोरियाचा निवडणूक मुद्दा; नेमके प्रकरण काय?


