🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मंत्री आणि आमदारांपोठोपाठ आता मंत्र्याच्या कार्यालयात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील २१ कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. तर छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील २२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या शिवाय वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि महसूलमंत्री यांच्या कार्यालयात देखील काही अधिकारी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
दरम्यान, राज्यात पुन्हा संपुर्ण लॉकडाऊन लागणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
“७०० मेट्रीक टन ऑक्सिजन आणि ४० टक्के बेड जेव्हा लागतील तेव्हा लॉकडाऊन लागेल पण आता तशी परिस्थिती अजिबात नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली म्हणून घाबरण्याच कुठलही कारण नाही. कारण हॉस्पिटलमध्ये १० ते १५ टक्के बेड फक्त लागले आहेत. मुबलक बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजनची मागणी देखील कुठेही वाढलेली नाही. मृत्यूदर देखील कुठेही वाढला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कुठलेही कारण नाही”, असे राजेश टोपे म्हणाले.
राजेश टोपे म्हणाले, “नागरिकांनी काळजी घ्यावी, आपण कोरोना संदर्भातील नियम पाळले नाहीत आणि आपण बेभान पद्धतीने वावरत राहीलो तर आपल्याला निर्बंध वाढवावे लागतील. जीवनावश्यक गोष्टी सोडता बाकीच्या गोष्टींना रोख लागला पाहीजे. मुंबई सारख्या शहरात मुख्यमंत्र्यांनी सुचना केली तर रात्री ११ ते सकाळी ५ निर्बंध लावता येतील. नाईट कर्फ्यूसाठी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवला आहे.”
महत्वाच्या बातम्या –
- सुनावणी होईपर्यंत कर्मचाऱ्यांनी ठाम राहावे, सुनावणी रद्द झाल्यानंतर सदावर्तेंचे आवाहन
- ‘सरकारला एसटी कर्मचाऱ्यांची कसलीच पर्वा राहिली नाही’; चंद्रकांत पाटलांची टीका
- “मुख्यमंत्री कोरोनाच्या छाताडावर चढून त्याचा कोथळा काढणार की…”; अतुल भातखळकरांची बोचरी टीका
- “…तर माझा हात पाहा आणि सांगा”, मुख्यमंत्री पदाबाबत राणेंचे मोठे भाष्य
- मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज नाही- इकबाल चहल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
