Share

“मुख्यमंत्री कोरोनाच्या छाताडावर चढून त्याचा कोथळा काढणार की…”; अतुल भातखळकरांची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

कोरोनाने (Corona) पुन्हा एकदा आपले तोंड वर काढले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. मुंबईत आता कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत असून काल एका दिवसात मुंबईत रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार गेला आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे हे घिसाडघाईने निर्णय घेणारे मुख्यमंत्री नसून ते धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत’, असा विश्वास व्यक्त केला होता. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी बोचरी टीका केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाला धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात. म्हणजे मुख्यमंत्री नेमकं काय करणार? घरी बसून गनिमीकाव्याने कोरोनाच्या छाताडावर चढून त्याचा कोथळा काढणार की त्याला नोटीस पाठवून पोलीस कारवाई करणार?”

काय म्हणाल्या होत्या किशोरी पेडणेकर?

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना पेडणेकर म्हणाल्या की,”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विचार घेऊनच निर्बंधांबाबत विचार करण्यात येणार आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईत मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विकेंडला ठिकठिकाणी गर्दी होते,रस्त्यावर विक्रेत्यांना ना ग्राहकांना चिंता, अशी परिस्थिती दिसून येत आहे. नागरिकांवर घरात बसायची वेळ नाही पण स्वत:ला सांभाळण्याची वेळ आहे”,असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की, “जर आत्ताच्या परिस्थितीला गांभीर्याने घेतलं नाही, तर धोक्याची पातळी ओलांडून गेल्यावर धावपळ होणार. ती वेळीच रोखावी, अशा पद्धतीने मुख्यमंत्री सकारात्मक विचाराने चाललेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला पक्की खात्री आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे घिसाडघाईने निर्णय घेणारे मुख्यमंत्री नसून ते धोक्याची पातळी ओलांडू देणार नाहीत”, असा विश्वासही पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!