🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील ‘सुरक्षा त्रुटी’ बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबतही त्यांनी मोठे भाष्य केले आहे. ‘महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदाचा दावेदार मी असणार असे कोणी सांगितले. मी तर असे कधी बोललो नाही. तुम्हाला काही भविष्य माहिती असेल तर माझा हात पाहा आणि सांगा. मी असा काही विचार केलेला नाही. मी एकदा मुख्यमंत्री झालो आहे आणि आता केंद्रात मंत्री आहे.’ अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
तसेच पंतप्रधानांच्या गाडीवर दगडफेक आणि हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. असे नारायण राणे म्हणाले आहे. ते वाराणसी येथे एका कार्यक्रमानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी तरुणांना रोजगाराशी जोडण्यासाठी वाराणसीमध्ये कॉयर बोर्ड (नारळ उद्योग) कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू होईल. दक्षिण भारतामध्ये तरुणांना उद्योगाशी जोडण्यासाठी एक फायबर बँक उघडली जाईल, जिथे दक्षिण भारतातून कच्चा माल येईल. वाराणसीसह, प्रयागराज, लखनऊ आणि कानपूरमध्येही कॉयर बोर्ड शोरूम उघडतील अशी माहिती दिली आहे.
दरम्यान राणे यांनी काशीमध्ये कॉयर उद्योग उभारण्याचे आश्वासनही दिले आहे. वाराणसीमध्ये आयोजित कॉयर फेस्टिव्हलमध्ये राणेंनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी हे विधान केले.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मोदींचे ढोंग जनतेसमोर आले’, सचिन सावंत यांचा टोला
- अभिनेत्री स्वरा भास्करची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह ; पोस्ट झाली व्हायरल
- पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला- नाना पटोले
- “शिवसेनेचा गोव्यात एक सरपंच सुद्धा नाही”, प्रमोद सावंत यांची टीका
- ‘मुंबईत मिनी लॉकडाऊन लागणार?’, पेडणेकरांनी दिले उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
