🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे कौतुक केले आहे. अजित दादा कधीही मास्क काढत नाहीत, मला त्यांचं कौतुक वाटतं, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत. मुंबईत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले, कसं आहे की मास्क घातलाच पाहिजे. मी आता बोलतोय त्यामुळं मी मास्क काढलाय, मला आजित दादांच कौतुक वाटतं की ते मास्क कधीच काढत नाहीत. पण हेही खरं आहे, मास्क घातलाच पाहिजे, मी पण मास्क वापरतो, आणि मी मास्क जर वापरला नाही तर ताबडतोब मला माझ्या मुलीचा फोन येतो. मी आता मास्क काढला तर दहा मिनीटांनी मुलीचा फोन येईल, ती माझी जास्त काळजी घेते, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोक गांज्या मारुन बोलतात, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली होती. या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले, मी गंभीरपणे घेत नाही, डॉक्टरापेक्षा कम्पाऊंडर बरा. असा टोला संजय राऊत यांना लगावला. एसटीच्या कर्मचारी संपाबाबत संमजस्यपणे विचार केला पाहिजे. एसटी कर्मचऱ्यांनी ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही शपथनाम्यात सांगितल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देऊ असे तुम्ही म्हणाले होते. तसेच अजित पवारांवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मला अजित दादांचं कौतुक वाटतं, ते कधीच मास्क काढत नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- “परबांनी शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहीला नाही ना?”, मुनगंटीवारांचा सवाल
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
