🕒 1 min read
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र पाठवले आहे. आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मराठी भाषेच्या मुद्द्यावर आणि अजित पवारांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर विचारणा केली असता प्रतिक्रिया दिली आहे. आज ते पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमसाठी आले होते.
मराठी भाषा एवढी समृद्ध भाषा आहे. तिला तुम्ही कोणतं स्थान द्या न द्या, अभिजात बोला न बोला, पारिजात बोला त्याने काही होणार नाही. मराठी भाषा स्वतःमध्ये अतिशय समृद्ध भाषा आहे, अतिशय समृद्ध साहित्य आहे आपल्याला त्यावर गर्व असला पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येकाला आम्ही म्हंटल आहे की, मराठीचा वापर करा. व्यासपीठावर सर्वजण भाषाण मराठीत देत होते, ते मला समजत होते, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत.
मा. राष्ट्रपती महोदय, नमस्कार… भारत सरकारने 2004 साली भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे. ह्याला आता सात वर्षे उलटून गेली. साहित्य अकादमीने केलेली ही शिफारस ताबडतोब अंमलात येणं गरजेचं आहे, असे अजित पवार राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रामध्ये म्हणाले आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीनं महामहिम राष्ट्रपती महोदय श्री राम नाथजी कोविंद साहेब यांना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पत्रमोहिमेत सहभाग घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. pic.twitter.com/LafQZ4a3Hb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 24, 2021
मराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी, धर्मभाषा आणि लोकसभाषा म्हणून जागतिक भाषांमधील अग्रणी भाषा आहे. ह्या संदर्भातील अनेक पुराव्यांनी हे शाबित होते की मराठी ही अभिजात भाषा आहेच. तरी कृपया मराठीला तो दर्जा द्यावा, अशी आपल्याला नम्र विनंती आहे. असेही अजित पवार यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “नितेश राणेंच्या बालिशपणाने कोकणाची मान खाली गेली”
- “सफाई कामगाराने आत्महत्या केली, आता ३ जणांचे निलंबन करुन काय फायदा?”
- शाळेबाबत अद्याप निर्णय नाही; राजेश टोपेंची माहिती
- …म्हणून मेनका गांधींनी माझी भेट घेतली; आव्हाडांनी केला त्या भेटीचा खुलासा
- केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
