🕒 1 min read
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून गेल्या चौदा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते धरणे आंदोलन करत आहेत. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण ही प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. आता राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबईत दाखल होण्यापूर्वीच पोलिसांकडून त्यांना रोखले जात आहे. याविषयी आता रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर(Mahajan Jankar) यांनी भाष्य केले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना जानकर म्हणाले, ‘आमचे सरकार असताना कुठं झाले विलिनीकरण? रस्त्यावर असताना एक बोलावं लागत आणि आत गेल्यावर एक असतं, त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळं जनतेनं हुशार झालं पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे.’ तसेच आमच्या काळातही एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा झालं नाही, जनतेनं हुशार होणं हाच मार्ग आहे,असेही जानकर म्हणाले.
दरम्यान, बुलडाण्यात शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी महादेव जानकर आले होते. तुपकर हे माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले. जानकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
महत्वाच्या बातम्या:
-
- समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला ट्विट करत, नवाब मलिकांच्या मुलीचा नवा दावा
- भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी- बाळासाहेब थोरात
- गेहलोत मंत्रिमंडळात फेरबदल; १५ मंत्री घेणार शपथ
- कोणाच्या अंगी देव येतो, निघून जातो, पण बाबासाहेबांच्या अंगी…- संजय राऊत
- मुख्यमंत्र्यांची घोषणा; आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना करणार मोठी मदत

