Share

महापूरग्रस्त महिलांना मंदीर संस्थानकडून तुळजाभवानी देवीच्या २५ हजार साड्यांची मदत

Published On: 

🕒 1 min read

तुळजापूर : सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच कोकणात चिपळूण आणि महाड मध्ये अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली. त्यात मोठी मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली आहे. पुरामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे. तसेच आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. अनेक राजकीय पक्ष पूरग्रस्त भागात मदतीचा हात देत आहे. अनेक जीवन आवश्यक वस्तू देखील पाठवत आहे.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता तुळजापूर देवस्थांकडून मोठी मदत करण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थान पूरग्रस्त भागामधील महिलांना साड्या पाठवून मदत करणार आहे. पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या समितीस महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांना देवीच्या २५ हजार साड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन केले होते.

पालकमंत्र्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत मंदीर संस्थान समितीने या २५ हजार साड्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर संस्थान समितीकडे १० ऑगस्ट २०२१ पर्यंत शिल्लक असलेल्या नऊवारी १ हजार आणि सहावारी २४ हजार साड्यांचे नग आहेत. एकूण २५ हजार साड्या महाराष्ट्रातील महापूराने बांधित झालेल्या महिलांसाठी पाठवण्यात येणार आहेत. रायगड,रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वाटपासाठी पाठविण्यात येणार आहेत. अशी माहिती मंदीर संस्थान समितीकडून सध्या मिळत आहे.

दरम्यान, अनेक सामजिक संस्था सुद्धा मदतीचा हात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला देत आहे. त्याच बरोबर सामान्य नागरिक सुद्धा मदत करत आहे. दुर्घटना आणि संकटामुळे तेथील नागरिक हतबल झाले आहे. परंतु मदतीचा असाच ओघ सुरु राहिल्यास काही काळात तेथील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येईल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!