नवी दिल्ली : कोरोना हा रोग अद्यापही पूर्णपणे नष्ट झालेला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे सर्वांचे लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात व्यापक लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. त्यातच आता भारत आणि युगांडामध्ये कोविशिल्ड लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक आरोग्य संघटने (WHO)च्या तपास विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. या धक्कादायक बाबीला खुद्द सिरम इन्सिटीट्युटने दुजोरा दिला आहे. भारतामध्ये कोविशील्ड लसीच्या 2 एमएलच्या वायल्स आढळून आल्या आहेत. पण वास्तवात सिरम इन्स्टिट्युटकडून 2 एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात जाणीवपूर्वक काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.
खुद्द सिरम इन्स्टिट्युटनं या धक्कादायक घटनेला दुजोरा दिल्यामुळे लसीकरणामुळे करोनाची भिती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे.
‘अशा प्रकारच्या बनावट लसी जागतिक आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून करोना होण्याची शक्यता अधिक असलेल्या नागरिकांसाठी गंभीर ठरू शकतात. या बनावट लसी तातडीने शोधून काढून हटवणं हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे’, असं देखील जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या वेबसाईटवर नमूद केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही कितीही ताकद लावा शेतकरी येणार अन् बैलगाडा शर्यत होणारच’
- भारतातील मुस्लिम लॉ बोर्डाकडून तालिबानचे कौतुक
- ‘मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा दिल्लीतून लस आणण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत’
- तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी तुलना केल्याने समाजवादी पक्षाच्या खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
- ‘ मातोश्रीने करून दाखवलं ! काम केलं म्हणून उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये आले’


