Share

‘उद्धव ठाकरे आडमार्गाने येऊन सत्तेत बसलेत; आता त्यांचे कमी दिवस उरलेत’

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरवात केली आहे. मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. शिवसेनेकडून त्यांना विरोध केल्यांनतर ते बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी येणार कि नाहीत असा सवाल निर्माण झाला होता.

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. कोरोनाच्या संकटात अशी यात्रा काढून कोरोनाला निमंत्रण दिले जात असल्याची टीका शिवसेनेनं केली होती. आता टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे आडमार्गाने येऊन सत्तेत बसलेत, आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आम्ही शपथ घेतली आहे, त्याचं पालन करु. आम्हाला नियम शिकवण्याची गरज नाही. आम्ही कोरनाचे नियम पाळत आहे, पालन करु. आम्हाला उपदेशाची गरज नाही,’ असं राणे म्हणाले.

‘जन आशीर्वाद यात्रेचा प्रतिसाद पाहता फारच कमी दिवस राहिले आहेत, वाट पाहा. पाऊस नसता तर शक्तीप्रदर्शन केलं असतं, पाऊस असून इतके लोक आहेत. आमची शक्ती आमच्या विरोधकांना माहिती आहे,’ असा टोला देखील नारायण राणे यांनी विरोधकांना लगावला आहे.

मी जिथं उभा आहे तिथून बाजूलाच कलानगर…

मी जिथं उभा आहे तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे काही गोष्टी त्यांच्या कानावर गेल्याच पाहिजेत. जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार आता तुमच्या हातात राहणार नाही, असा विश्वास यावेळी राणेंनी या जन आशिर्वाद यात्रेमध्ये व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!