Share

‘त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार आता तुमच्या हातात राहणार नाही’; नारायण राणेंचा विश्वास

Published On: 

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशिर्वाद यात्रेला सुरवात केली आहे. यावेळी त्यांनी ‘मातोश्री’च्या बाजूला असणाऱ्या परिसरात आपले पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राच्या इंच इंच जमिनीवर महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे कोणीही विनाकारण आपल्याला झेपणार नाहीत अशा गोष्टी करु नयेत, नाहीतर येणाऱ्या महापालिकेत २ वर्षात तुम्ही इथल्या जनतेला कसं पाठीमागे टाकलं याचा उद्धार होणारच आहे, अशी बोचरी टीका नारायण राणेंनी यावेळी केली आहे.

मी जिथं उभा आहे तिथून बाजूलाच कलानगर आहे. त्यामुळे काही गोष्टी त्यांच्या कानावर गेल्याच पाहिजेत. जनता तुमच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार आता तुमच्या हातात राहणार नाही, असा विश्वास यावेळी राणेंनी या जन आशिर्वाद यात्रेमध्ये व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला मंत्रीपद दिले आहे, त्यामुळे मला आपली साथ हवी आहे, असं म्हणत नारायण राणेंनी मुंबईतील जन आशिर्वाद यात्रेमध्ये जनतेला आशिर्वाद मागितला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांविषयी गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता नारायण राणेंनी जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून आपल्या पहिल्याच भाषणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!