Share

धक्कादायक! नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : नांदेड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यानी आत्मदहनाचा प्रयत्न केला. छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून घेतले. मात्र, पोलिसांना या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी आंदोलकांजवळील पेट्रोलचा कॅन जप्त केला. तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी नांदेडमध्ये छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय मूक निदर्शने करण्यात येणार आहेत. त्याच्या एक दिवस अगोदर छावाने हे आंदोलन केले. आजपर्यंत मराठा समाजाने आरक्षणासाठी ५८ मूक मोर्चे काढले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे छावाने ठोक मोर्चा सुरू केला आहे, त्या पार्श्वभूमीवर छावाने आंदोलन केले असल्याचे दशरथ कपाटे यांनी सांगितले.

 

आंदोलनाच्या वेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाबाबत मागणी केली. यावेळी पोलिसांनी छावाच्या कार्यकर्त्याना अटक करून वजीराबाद पोलीस ठाण्यात नेलं. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून घेतले होते. यावेळी प्रचंड घोषणा ही देण्यात आल्या. पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्याना आवरले. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या छावाचे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!