मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. यावेळी त्यांनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी राणे यांनी ‘साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. साहेब असते तर म्हटले असते, नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असं मी समजतो.’ असे मत राणे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन करू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याच मुद्द्यावरुन राणेंनी शिवसेना नेत्यांना टोला लगावला. स्मृतीस्थळ आणि स्मारकांवर कुणाला रोखण्याचा प्रकार कुणी करू नये. बाळासाहेब ही काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हते. ते संपूर्ण राज्याचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्याबद्दल प्रत्येकालाच खूप आदर आणि अभिमान आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यापासून कुणी कुणाला रोखू शकत नाही. मुंबई पालिकेतील शिवसेनेचा पापाचा घडा आता भरलाय तो लवकरच फुटणार आहे आणि यंदा पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणारच’, असा इशारा यावेळी राणेंनी दिला आहे.
दरम्यान राणे यांनी शिवतीर्थावर जाऊन त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार आता तुमच्या हातात राहणार नाही’; नारायण राणेंचा विश्वास
- टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्हे तर ‘या’ पदासाठी केला राहुल द्रविडने अर्ज
- चांदनी चौकातील खड्डे आठ दिवसांत बुजवा, कारणे देऊ नका! चंद्रकांतदादांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा
- धक्कादायक! नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
