🕒 1 min read
सांगली : महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. मात्र ही पाण्याची पातळी स्थिर झाली आहे. पण वाढलेल्या पातळीमुळे सांगली शहर हे जलमय झाले आहे. जवळपास 60 टक्के शहर कृष्णेच्या पुराच्या विळख्यात सापडलेला आहे. ताकारी आणि भिलवडी याठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरू लागली. पण सांगली शहरात आलेल्या पुराने 2005 मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या सांगली शहरातला शहरी भाग पूर्ण पाण्याखाली गेला आहे. स्टेशन चौकापासून, शिवाजी स्टेडियम, मीरा हाउसिंग सोसायटी, संपूर्ण वखार भाग, एसटी स्टँड परिसर, सांगली शहरातला विस्तारित भाग असणारा शामराव नगर यासह सांगली- कोल्हापुर रोड संपूर्ण पाण्याखाली गेला आहे. सांगली शहरातले जवळपास एक हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
तर लाखो लोकांचं स्थलांतर या ठिकाणी झाले आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातल्या महापालिकांच्या शाळांमध्ये आणि इतर खासगी ठिकाणी तात्पुरते निवारा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची व्यक्त केली इच्छा
- ‘फुकट सहलीला येऊ नका; शहर उभारायचंय, मदत घेऊन या’, निलेश राणेंचं सत्ताधाऱ्यांना आवाहन
- केंद्रीय मंत्री राणे, फडणवीस, दरेकर कोकण दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची पाहणी
- मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- अखेरचा सामना गमावूनही प्रशिक्षक राहुल द्रविडचे ‘या’ कारणासाठी होत आहे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
