Share

अखेरचा सामना गमावूनही प्रशिक्षक राहुल द्रविडचे ‘या’ कारणासाठी होत आहे कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्विकारावा लागला आहे. भारताने दिलेल्या २२५ धावांचे आव्हान श्रीलंकेने ३९ षटकांत ७ गडी गमावत सहज पार केले. मात्र मालिका भारताने २-१ अशी जिंकली.

एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या या सामन्यात भारताचा श्रीलंकेने पराभव केला. मात्र पराभवानंतरही प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाने या सामन्यात तब्बल पाच खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. प्रशिक्षक द्रविड आणि संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमिज राजा यांनी राहुलचे कौतुक केले आहे. त्याच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलखतीत ते म्हणाले, ‘अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पाच नव्या खेळाडूंना संधी देणे हा खुपच कौतुकास्पद निर्णय होता. सामना हरण्याच्या भितीने अनेक संघ नव्य खेळाडूंना संधी देण्याचे टाळतात.’ असे ते म्हणाले.

यावेळी ते पुढे म्हणाले,’प्रशिक्षक राहुल द्रविडची काम करण्याची पद्धत ही खुप वेगळी आहे. तो जिंकणे आणि हरण्याबाबत विचार करत नाही. त्यांच्या या निर्णयामुळे नवीन खेळाडुंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.’ एकाच सामन्यात पाच खेळांडूना पदार्पणाची संधी देण्याची ही भारतीय क्रिकेटमध्ये दुसरी वेळ. यापुर्वी १९९९ मध्ये पाच खेळाडूंनी एकत्र पदार्पण केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!