Share

केंद्रीय मंत्री राणे, फडणवीस, दरेकर कोकण दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची पाहणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तळीयेनंतर आज चिपळूणकडे रवाना झाले आहेत. चिपळूणमधील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील कोकण दौऱ्यावर आहेत.

गेल्या चार दिवसात राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे कोकणातील अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांनी कौकण दौरा आखला आहे.

नारायण राणे यांनी कोकणमधील पूरग्रस्त आणि दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यांनी ट्विट केले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत.

मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर
सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने ते चिपळूणसाठी रवाना झालेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता ते पोहोचले. त्यानंतर ते वाहनाने चिपळूणकडे रवाना झाले. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी २.४० वाजता अंजनवेलहून हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!