🕒 1 min read
नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र आता याच मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश पक्षाने दिले तर आपण येथून निवडणूक लढवू असे पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले. नागपूर दक्षिण-पश्चिम हा पूर्वीचा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. हा मतदार संघ पुन्हा परत घेण्यासाठी इतका सोपा आहे, की पक्षाने जर आदेश दिला तर मी पण या ठिकाणी लढू शकतो असे नाना पटोले नागपुरातील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
दक्षिण पश्चिम मतदार संघात काँग्रेस निवडून येऊ शकत नाही असा समज होता. पण सध्याच्या घडीला जे काही सर्वेक्षण पक्षांतर्गत केले आहे, त्यातून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळू शकतो हे समोर आल्याचेही नाना पटोले म्हणाले. काँग्रेस पक्षाने जेव्हा आदेश दिले तेव्हा नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढविली. यामुळे या ठिकाणी लढण्याचे आदेश दिल्यास इथून लढू असे सूचक विधान पटोले यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे-बंगळूरू महामार्ग अजूनही बंदच, रस्त्यावर तीन फुट पाणी
- ‘फुकट सहलीला येऊ नका; शहर उभारायचंय, मदत घेऊन या’, निलेश राणेंचं सत्ताधाऱ्यांना आवाहन
- केंद्रीय मंत्री राणे, फडणवीस, दरेकर कोकण दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची पाहणी
- मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- अखेरचा सामना गमावूनही प्रशिक्षक राहुल द्रविडचे ‘या’ कारणासाठी होत आहे कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
