Share

‘फुकट सहलीला येऊ नका; शहर उभारायचंय, मदत घेऊन या’, निलेश राणेंचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

Published On: 

रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे चिपळूण शहर संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. व्यापारी संपले आहेत. शहराचे बहुसंख्य भाग सपाट झाले आहेत. हे शहर आपल्याला नव्याने उभे करायचे आहे. तेव्हा इथे फुकट फिरायला येऊ नका, मदत घेऊन या, असा रोखठोक सल्ला माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश यांनी सत्ताधारी मंत्री, आमदार आणि नेत्यांना दिला. ते चिपळूण येथे बोलत होते.

निलेश राणे म्हणाले, ‘चिपळूण शहरावर भीषण संकट कोसळले आहे. शहरभर चिखल आणि राड्यारोड्याचे साम्राज्य पसरले आहे. हे शहर पुन्हा उभे करण्यासाठी सर्वात अगोदर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रयत्न केले. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच सर्वात आधी ट्विट हे साडे आठ वाजता आले. शहराला मदत करण्यासाठी दिल्लीतून मदत पाठविण्यात आली. आम्ही गेल्या दोन दिवसांपासून इथे काम करीत आहोत. आमच्या रूपाने नारायण राणेच इथे कार्यरत आहेत.’

‘आम्ही गेल्या दोन दिवसांपासून इथे काम करित आहोत. इथे सत्ताधारी पक्षाचे नेते इकडे तिकडे फिरताना दिसतात. त्यांनी फुकटच्या सहली करु नयेत, लोकांना मदत करावी’, असा सल्ला राणे यांनी दिला. ‘एनडीआरएफचे लोक काम करित आहेत, पण एसडीआरएफ कुठेही दिसत नाही’, अशी टीका त्यांनी केली.

निलेश राणे स्वत: मैदानात
गेल्या दोन दिवसांपासून निलेश राणे मदत साहित्य घेउन चिपळूण आणि परिसर पिंजून काढीत आहेत. चिपळूण येथील वडनाका पवार आळी तसेच पेठमाप तांबट आळी येथील पूरग्रस्त कुटुंबांना निलेश राणे यांच्या माध्यमातून चटई, ब्लॅंकेट व फरसाण, चिवडा, चकली, बिस्किटे, पाणी जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. यावेळी मोठ्या संख्येने पुरग्रस्त बांधव उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!