Share

मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी

Published On: 

मुंबई : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. पावसाने उसंत घेतल्याने पाणी ओसरू लागले आहे. मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे. काल तळीये गावाचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तळीयेनंतर आज चिपळूणकडे रवाना झाले आहेत. चिपळूणमधील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.

सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने ते चिपळूणसाठी रवाना झालेत. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता ते पोहोचले. त्यानंतर ते वाहनाने चिपळूणकडे रवाना झाले. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. त्यानंतर ते दुपारी २.४० वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

दरम्यान, राज्यातील पूरदुर्घटनेत आत्तापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १.३५ लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाड येथील दरड कोसळलेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी, तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांना धीर दिला. दरडीखाली गाडल्या गेलेल्या ढिगाऱ्यातून आता कोणी जिवंत बाहेर निघण्याची शक्यता राहिलेली नाही. घटनास्थळावर नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. त्यांचे सांत्वन करताना मुख्यमंत्र्यांनाही शब्द सुचत नव्हते. “तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भीषण दरडसंकटात सापडलेल्या नागरिकांना धीर दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!