Share

राज्यात पावसाने घेतले आतापर्यंत १२९ जणांचे बळी ; आकडा वाढण्याची भीती

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रावर सध्या अस्मानी संकटाने कल्लोळ माजवला आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावासाचा फटका रायगड आणि रत्नागिरीला बसला आहे. महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा हाहा:कार सुरु आहे. गेल्या काही दिवसांत पावसामुळे तब्बल 129 नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

राज्यातील काही भागात दरड कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढल्याचं थोरात म्हणाले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण 5 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. राज्यभरात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 129 वर पोहोचली आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे. तर हा आकडा वाढण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच त्यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, ‘प्रशासकीय यंत्रणा पाऊस, अंधार, पूल पडले असताना तळीये इथे सकाळी लवकर पोहचले आणि मदत कार्याला सुरुवात केली. आमची सगळी यंत्रणा फिल्डवर आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी काम करतायत. पुरानंतर मदत करणेही जिकरीचे आहे. स्वच्छता करण्याचं महत्त्वाचं काम यापुढे असेल.’ अशी माहिती ही त्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!